Bigg Boss 16 Winner: ‘बिग बॉस १६’चा खेळ आता अंतिम टप्प्याच्या दिशेने सरकत आहे. या दरम्यान आता घरातील एक एक स्पर्धक एलिमिनेट होऊन बाहेर पडताना दिसत आहे. नुकतीच अभिनेत्री सुम्बुल तौकीर खान ‘बिग बॉस १६’च्या घरातून बाहेर पडली आहे. तर, सुम्बुल पाठोपाठ निम्रत कौर अहलुवालिया देखील घराबाहेर पडली आहे. दरम्यान, नुकताच सुम्बुल तौकीर खानने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने या पर्वाचा विजेता कोण ठरू शकतो, याचे संकेत देखील दिले आहेत.