पुण्यात खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण भरले आहे. सोमवारी पहाटे ४ पासून पानशेत धरणातून १८ हजार क्युसेक तर खडकवासला धरणातून सकाळपासून २५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे.