Bharti Singh: ‘बिग बॉस ओटीटी २’ने डिजिटल विश्व चांगलंच गाजवलं आहे. यंदाचा सीजन अधिकच रंगतदार झाला आहे. अनेक नवेजुने चेहरे या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहेत. या सीझनच्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान खानसोबतच अभिनेता कृष्णा अभिषेक देखील होस्टिंग करताना दिसत आहे. तर, आता अभिनेत्री भारती सिंह देखील ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेणार आहे. मात्र, भारती या शोमध्ये पाहुणी म्हणून जाणार आहे. अवघ्या तीन ते चार तासांसाठी ती या घरात जाणार असली, तरी भरपूर धमाल करणार आहे.