VIDEO : नोकरी मागणारे नाही तर देणारे व्हा; नितीन गडकरींचं तरुणांना आवाहन
- Nitin Gadkari Speech In Vishwa Marathi Sahitya Sammelan : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध मानले जातात. अनेकदा त्यांनी विविध विषयांवरून विरोधकांसह स्वत:च्या सरकारवही नाव न घेता टोले हाणले आहे. परंतु आता त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग सांगितला आहे. मुंबईतील विश्व मराठी साहित्य संमेलनात बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, शिक्षण घेत असताना कमी मार्क पडले म्हणून इंजिनीयरींगला प्रवेश मिळाला नाही आणि आता बांधकाम क्षेत्रात चांगलं काम केल्यामुळं अनेक पुरस्कार मिळत आहेत. आतापर्यंत चार विद्यापीठांनी मला डी-लीटच्या पदव्या दिल्या आहेत. त्यामुळं विद्वान आणि हुशार असणं यात फरक असतो, असं म्हणत गडकरींनी तरुणांना मोलाचा संदेश दिला आहे.