Supriya Sule Speech Video : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार सुप्रिया सुळे यांनी वेल्हे येथील प्रचारसभेत भाषण केलं. त्यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या प्रचाराला उत्तर दिलं. केंद्रात आणि राज्यात ज्या पक्षाचं सरकार आहे, त्याच पक्षाचा खासदार असला तर विकास होईल, असा मुद्दा भाजपचे नेते मांडत आहेत. त्यांच्या या प्रचाराचा सुप्रिया सुळे यांनी उदाहरणं देऊन समाचार घेतला. सोलापूर आणि पुण्यात गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. तिथं अशी काय क्रांती घडली? सोलापूर आणि पुण्यात पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न कायम आहे, याकडं सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधलं.