ठाणे जिल्ह्यात बदलापूर येथे एका शाळेत ४ वर्ष वयाच्या दोन लहान मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर संतप्त पालक आणि नागरिक रस्त्यावर आले. शाळा तसेच पोलीस प्रशासनाने याप्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यात दिरंगाई केल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला. बदलापूर स्टेशनमध्ये 'रेल रोको' करणाऱ्या नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.