Shraddha Walker Murder Case : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावालावर दिल्लीतील फॉरेन्सिक ऑफिसबाहेर हिंदू संघटनेच्या एका कार्यकर्त्यानं तलवारीनं हल्ला केला आहे. आरोपी आफताबला पोलीस व्हॅनमध्ये नेलं जात असताना हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आफताबच्या दिशेनं तलवारीनं हल्ला केला. परंतु एका पोलीस अधिकाऱ्यानं हल्लेखोरांवर बंदूक रोखली. त्यानंतर पोलीस व्हॅन पोलिसांनी तुरुंगाच्या दिशेनं रवाना केली.