Ashwini Mahangade Speech at lok Sabha Election Rally : सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी वाई इथं झालेली सभा टीव्ही अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनं गाजवली. अश्विनीनं साताऱ्याचा विकास, मराठा आरक्षण यासह देशपातळीवरील प्रश्नांचाही आपल्या छोटेखानी भाषणात आढावा घेतला. देशावरील कर्ज, महागाई, भ्रष्टाचार याकडं तिनं लक्ष वेधलं. महिला खेळाडूंच्या बाबतीत जे राजकारण झालं, ते मनाला वेदना देणारं होतं, अशा भावना तिनं व्यक्त केल्या. अश्विनीच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रचंड प्रतिसाद दिला.