Ashok Saraf Speech: मराठी चित्रपट व नाट्यक्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली होती. यानंतर सर्वच स्तरातून अशोक सराफ यांचं कौतुक झालं. ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, ‘महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुरस्कार मला प्रदान केलात, याचा मला खरोखर आनंद होत आहे. ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो, जी माझी कर्मभूमी आहे अशा पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं. याशिवाय दुसरी आनंदाची गोष्ट कोणती नाही.’