Armoured corps centre and School : युद्धभूमीत रणगाडे अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात, हे नुकतेच अझरबैजान, आर्मेनिया आणि रशिया-युक्रेन युद्धातून सिद्ध झालंच आहे. त्यामुळं रणगाडा दल सुसज्ज ठेवण्याकडं प्रत्येक देशाचा कल असतो. भारतीय लष्करही त्यात मागे नाही. शत्रूचा अचूक वेध घेण्यासाठी आणि वेगवान प्रहार करण्यासाठी भारतीय लष्कराच्या आरमर्ड कोअर सेंटर आणि स्कूलमध्ये सध्या अत्याधुनिक साधनांच्या मदतीनं प्रशिक्षण दिलं जातं.