सध्या बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. मलायका आणि अर्जुनमध्ये १२ वर्षांचे अंतर आहे. मात्र, त्यांच्या नात्यावर या गोष्टीचा फारसा फरक पडत नाही. नुकताच अर्जुनने मलायकाचा मुलगा आरहन खानची भेट घेतली आहे. त्यांचा एकत्र हॉटेलमधून बाहेर येतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.