Arjun Kapoor Video: बॉलिवूड कलाकारांचे विमानतळावरील अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. कधी त्यांच्या ड्रेसिंग सेन्सची चर्चा रंगते तर कधी त्यांच्या वागण्याची. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन फोटोग्राफर्सवर चिडला आहे. अर्जुनला आधीच उशिर झालेला असतो आणि त्यात फोटोग्राफर्स त्याला फोटोसाठी पोझ देण्यास सांगतात.