Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात नुकताच हाणामारीचा प्रसंग पाहायला मिळाला. अभिनेता विशाल पांडे याने अरमान मलिकच्या पत्नीबद्दल वक्तव्य केल्यानंतर अरमानने त्याच्या कानाखाली मारली होती. विशाल पांडे याने अरमान मलिकची पत्नी कृतिका हिच्या सौंदर्याचं कौतुक केलं होतं. मात्र, याच गोष्टींमुळे अरमान मलिकला राग आला आणि त्याने विशालच्या कानाखाली आवाज काढला. या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना, आता ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने देखील विशालची पाठराखण केली आहे.