Anupamaa Fame Rupali Ganguly: ‘अनुपमा’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगुली ही नुकतीच भगवान महाकालेश्वराचं दर्शन घेण्यासाठी उज्जैनला पोहोचली होती. यावेळी तिने भस्म आरतीला देखील हजेरी लावली होती. तिच्यासोबत मालिकेत ‘अनुपमा’च्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता देखील उपस्थित होता. यावेळी अभिनेत्री रुपाली गांगुली हिने आपल्या मनातील भक्तीभाव शब्दांत व्यक्त केला.