Actors At Oth Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या फोरकोर्टमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील आठ हजारांहून अधिक पाहुणे उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत आयोजित या शपथविधी सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.