गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा अखेर काल १२ जुलै रोजी पार पडला आहे. या लग्नसोहळ्याला देश-विदेशातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. दरम्यान, मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया देशमुखने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जिनिलियाने नऊवारी साडी नेसून नाकात नथ, कपाळी चंद्रकोर असा मराठमोळा लूक केला आहे. तिच्या लूकची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.