'लाईक आणि सबस्क्राईब'चा वर्ल्ड प्रिमीयर नुकताच सिंगापूरमध्ये पार पडला. चित्रपटामधील कलाकार अमेय वाघ, जुई भागवत, राजसी भावे आणि दिग्दर्शक अभिषेक मेरूकर यांनी प्रीमियरला उपस्थिती दर्शवली होती. या खास शोला सिंगापूरमधील मराठमोळ्या प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असून चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात चित्रपटाचे कौतुक केले. तसेच तेथील प्रेक्षकांनी या सिनेमाचा रिव्ह्यू सांगितला आहे.