Amruta Khanvilkar Egg Wrap Recipe: ‘वाजले की बारा’ म्हणत अवघ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हॅनिटीमध्ये ‘एग व्रॅप’ बनवतानाचा रेसिपी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने भरपूर धमाल केली आहे.