Celebrities At Ayodhya: आज (२२ जानेवारी) अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, साऊथ स्टार चिरंजीवी आणि अभिनेता रामचरण अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार या सोहळ्याला हजेरी लावणार आहे. आता अयोध्येत प्रभू श्रीरामाचं स्वागत करण्यासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. आजचा दिवस देशभरात दसरा-दिवाळीसारखा साजरा केला जात आहे.