Amit Shah On Manipur Violence : काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभेत आणलेल्या अविश्वास ठरावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मणिपूर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर विरोधकांनी केलेला गंभीर आरोप अमित शहांनी मान्य केला आहे. मणिपुरात हिंसेचं तांडव झालं असून त्यामुळं देशाची मान शरमेनं खाली गेली आहे. अशा घटनांमुळं आम्हाला दुःख झालं असून त्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. मणिपूर हिंसाचारावर राजकारण करणं देखील धोकादायक असल्याचं सांगत अमित शहांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.