Amir Hussain Lone Cricketer : जम्मू काश्मीरचा आमिर हुसैन लोन हा दोन्ही हात नसतानादेखील फलंदाजी आणि गोलंदाजी करतो. आमिर बिजबेहारा येथील वाघमा गावचा रहिवासी आहे. वयाच्या ८व्या एका मिलमध्ये काम करताना आमिरने आपले दोन्ही हात गमावले. दोन्ही हात गमावल्यानंतरही आमिरने हार मानली नाही. आज आमिर ३४ वर्षांचा असून जम्मू-काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आहे.