दिवाळीत फटाक्यांमुळे मुंबईसह राज्यात वायुप्रदूषणात वाढ होऊ नये यासाठी रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा निर्बंध पाळला गेला नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे.