Akshay Kumar: अक्षय कुमारचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय मुंबईच्या मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसत आहे. यादरम्यान चित्रपट निर्माते दिनेश विजान देखील अक्कीसोबत दिसत आहेत. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे , अक्कीने आपला चेहरा अशा प्रकारे झाकून घेतला की, चाहत्यांना त्याला ओळखताही येणार नाही.