Akshay Kumar-Nora Fatehi Dance Video: बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहे. या निमित्ताने तो सध्या अनेक इव्हेंट्सला हजेरी लावत आहे. सध्या अक्षय कुमारचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार आणि नोरा फतेही आपल्या डान्सचा जलवा दाखवत आहेत. या व्हिडीओमध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री नोरा फतेही अक्षयच्या एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या डान्स दरम्यान अक्षय कुमार काही क्षणांसाठी लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये दिसतो.