बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता म्हणून अक्षय कुमार ओळखला जातो. लवकरच त्याचा 'खेल खेल मैं' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा धुमधडाक्यात पार पाडला. या सोहळ्यात अक्षय कुमारे फोटोग्राफर्सला आयफोन गिफ्ट म्हणून दिले आहेत. ते पाहून नेटकऱ्यांनी अक्षयचे कौतुक केले आहे.