Akshay Kumar at Mahakaleshwar temple: जगप्रसिद्ध महादेव मंदिर अर्थात उज्जैनच महाकालेश्वर मंदिर सध्या सेलिब्रेटींनी गजबजलेलं दिसत आहे. आता चित्रपट अभिनेता अक्षय कुमार त्याच्या वाढदिवसानिमित्ताने महाकालेश्वर मंदिरात पोहोचला होता. चित्रपट अभिनेता अक्षय कुमारने बाबा महाकालच्या भस्म आरतीला उपस्थित राहून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते. नंदी हॉलमध्ये बसून अक्षय कुमार ‘ओम नमः शिवाय’चा जप करताना भोलेबाबाच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसला.