Akshay Kumar Dance Video: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या कूल स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. जयपूरमधील एका लग्नसोहळ्यात अक्षय कुमार साऊथ सुपरस्टार अभिनेता मोहनलालसोबत भांगडा करताना दिसला. या लग्नाच्या वरातीत दोघांनीही पायाला पाय लावून जोरदार भांगडा केला. हा व्हिडीओ अक्षयने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहते देखील दोघांचा हा धमाल भांगडा डान्स पाहून खूश झाले आहेत.