Akshay Kelkar Video: ‘बिग बॉस मराठी ४’मधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अक्षय केळकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावल्यानंतर सध्या तो एका मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत झळकत आहे. या दरम्यान, त्याने मुंबईत स्वतःचं घर देखील घेतलं आहे. याच घरात त्यानं विठुरायाची एक सुंदर मूर्ती देखील ठेवली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अक्षय केळकर याने त्याच्या घरातील विठुरायाची मूर्ती सुंदर वस्त्रांनी सजवली आहे. ही सजावट करण्यासाठी त्याने आपल्या आईच्या साड्यांचा वापर केलाय. पाहा त्याचा हा सुंदर व्हिडीओ...