Ajit Pawar full speech: राष्ट्रवादीतील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथमच मनमोकळेपणाने भाषण केलं. राष्ट्रवादीत मला अनेकदा उपमुख्यमंत्रीपद मिळालं. मला पण मुख्यमंत्री व्हायचं आहे, अशी स्पष्ट इच्छा अजित पवार यांनी बोलून दाखवली. शरद पवार यांना राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला अजित पवार यांनी यावेळी दिला.