Bachchan family At Anant Ambani Pre Wedding: सध्या बॉलिवूडमध्ये बच्चन कुटुंब प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपासून या कुटुंबामध्ये वाद सुरू असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, या सगळ्या दरम्यान बच्चन कुटुंब एकत्र स्पॉट होत आहे. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन हिचे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याशी वाद सुरू असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्यात बच्चन कुटुंब एकत्र पोहोचलं होतं. यावेळी जया बच्चन मात्र गैरहजर होत्या.