Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मंगळवारी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात झालेल्या ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना हा सन्मान प्रदान केला. यावेळी कार्यक्रमाला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व दिग्गज कलाकार उपस्थित होते. या प्रसंगी मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या.