Sandeep Pathak: संदीपने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ८५ वर्षांचे आजोबा दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तो या आजोबांचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो आजोबांशी संवाद साधताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘प्रवासात ८५ वर्षांचे आजोबा भेटले. दोन वेळा अंगावरुन बैलगाडी गेली आणि त्यानंतर टमटमनेही धडक दिली. तरीही जगण्याची उमेद व इच्छाशक्ती कायम आहे. या वयातदेखील आजोबांनी शेतीकडे दुर्लक्ष केले नाही. अशी माणसं मला जगण्याची प्रेरणा देतात आणि मला जगण्याकडे सकारात्मकतेने बघायला शिकवतात. आजोबा, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो.’