Adesh Bandekar: ‘दार उघड बये दार उघड’ असं म्हणत महाराष्ट्रातील घराघरातील वहिनींना मनाची पैठणी देऊन सन्मान करणारे लाडके भावोजी म्हणजे आदेश बांदेकर. आता आषाढ महिन्याची सुरुवात होणार असून, सगळ्यांनाच विठुरायाच्या भेटीची आस लागते. आता याच दरम्यान आदेश बांदेकर यांनी आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींचे आणि देहू येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. पाहा झलक...