Waheeda Rehman: भारतीय चित्रपटसृष्टीत जवळपास ६६ वर्ष दिलेल्या अतुलनीय योगदानबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ५३व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सहा दशकांच्या कारकिर्दीत वहिदा रेहमान यांनी ९०हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. 'प्यासा', 'कागज़ के फूल', 'चौदवी का चाँद', 'साहेब बीबी और गुलाम', 'गाईड', 'खामोशी' आदी चित्रपटांमध्यील त्यांच्या भूमिकांचे समीक्षकांनी कौतुक केले. आपल्या अभिनय सामर्थ्यांच्या जोरावर त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत.