Padma Vibhushan Vyjayanthimala: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला बाली यांना दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नागरी नियुक्ती समारंभात पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाला पीएम मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. वैजयंतीमाला, भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी १९५०-६०च्या दशकात भारतीय पडद्यावर राज्य केले. ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘आशा’, ‘साधना’, ‘गंगा जमुना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट अभिनय दाखवला.