Actress Tejasswi Prakash: अनकेदा आपण फिरायला जाण्याच्या उत्साहात काही महत्त्वाच्या आणि गरजेच्या गोष्टी घरीच विसरून निघून जातो. असंच काहीसं अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिच्यासोबत घडलं आहे. बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत दुबई फिरायला निघालेली तेजस्वी प्रकाश चक्क आपला पासपोर्टच घरी विसरून आली होती. विमानतळावर तिकीट तपासणीसाठी जाताना ही गोष्ट तिच्या लक्षात आली. मात्र, अभिनेत्रीची आई तातडीने तिच्या मदतीला धावून आली. लेक घरीच विसरून गेलेली ही गोष्ट घेऊन आई धावत विमानतळावर पोहोचली.