Swara Bhasker joins Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'त अभिनेत्री स्वरा भास्कर देखील सहभागी झाली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, ‘राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दोन भारत जोडो यात्रा वाखाणण्याजोग्या आहेत. लोकांचं ऐकण्यासाठी देशभर फिरला असा, असा दुसरा कोणी राजकारणी मला माहीत नाही. राहुल गांधींना लोकांना भेटायचे आहे आणि त्यांच्याशी नाते जोडायचे आहे. असे प्रयत्न लोकांना आशा देतात, असे म्हणत स्वरा भास्करने राहुल गांधी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.