Shivali Parab New Movie: आजवर शिवालीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता शिवाली एका वेगळया भूमिकेतून ‘मंगला’ या चित्रपटातून मोठा पडदा गाजवायला सज्ज होत आहे. मंगलावर झालेला अॅसिड अटॅक आणि त्या कठीण परिस्थितीशी तिने दिलेली झुंज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकतंच मुंबईतील लालबागच्या राजाच्या चरणी चित्रपटाचे पोस्टर अनावरण झाले असून, ‘मंगला’ ही व्यक्तिरेखा अभिनेत्री शिवाली परब साकारणार असल्याचं समोर आलं आहे.