Rupali Bhosle: मराठीत सध्या रुपाली हे भोसले हे नाव प्रचंड चर्चेत आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली ‘संजना’ अर्थात अभिनेत्री रुपाली भोसले आता सगळ्यांचीच आवडती बनली आहे. या मालिकेत जरी रुपाली ग्रे शेड भूमिका साकारत असली, तरी ती प्रत्येक सीनसाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहे. नुकताच या मालिकेत दहीहंडीचा सीन शूट करण्यात आला आहे. या सीनसाठी रुपाली भोसलेने विशेष मेहनत घेतली होती. त्याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.