काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यात्रेला पाठिंबा मिळत असून अनेक सेलिब्रिटी यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्यासोबत काही पावलं चालत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. नुकतीच अभिनेत्री रिया सेन ही यात्रेत सहभागी झाली. याआधी अभिनेत्री-निर्माती पूजा भट्ट हिनंही यात्रेत सहभाग घेतला होता.