Actress Janhvi Killekar: ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत ‘सानिया’ ही भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिला मोठा धक्का बसला आहे. तिच्या पेणमधील घरी जबरी चोरी झाली आहे. जान्हवी आणि तिच्या कुटुंबाने नुकतंच पेणमध्ये एक बंगला बांधला होता. शनिवार-रविवार सुट्टीच्या निमित्ताने संपूर्ण किल्लेकर कुटुंब या घरी राहायला यायचे. मात्र, त्यांच्या याच घरात मोठी चोरी झाली असून, घरातील महागडे समान चोरांनी नेले आहे. आपल्या घराची ही अवस्था पाहून जान्हवीच्या आईला धक्का बसला आणि त्याला पॅरालेसीसचा झटका आला आहे. अभिनेत्रीवर सध्या दुहेरी संकट कोसळलं आहे. एक व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.