Actress Hina Khan: अभिनेत्री हिना खानने कॅन्सरच्या उपचारादरम्यान काम करण्यास सुरुवात केली आहे. हिना खानने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यात ती शूटिंग सेटवर मेकअप करताना दिसत आहे. हिना खानने व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पण, त्याचवेळीच तिने काम करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे हिनाला आनंद मिळत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हिना खान केमो थेरपीचे टाके लपवताना दिसली आहे.