Actress Apurva Nemlekar: मराठी मालिका विश्वातील प्रसिद्धी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या तिच्या नव्या मालिकेमुळे चर्चेत आली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेच्या निमित्ताने तिने स्वतःला एक खास लूक दिला आहे. या लूकमध्ये ‘शेवंता’ अर्थात अपूर्वा नेमळेकर खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीची गुलाबी रंगाची साडी आणि मनमोहक अदा पाहून प्रेक्षक देखील घायाळ झाले आहेत.