बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. तिचे फोटो आणि व्हिडीओ हे कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा हात फ्रॅक्चर झाला असल्याचे दिसत आहे. ऐश्वर्याचा हा कशामुळे फ्रॅक्चर झाला आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.