Aanchal Tiwari Video: २५ फेब्रुवारी रोजी एक भीषण अपघात झाला होता. याच अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. या अपघातात आंचल तिवारी हिचे देखील निधन झाल्याचे म्हटले गेले होते. पण, इथे नावांनी मोठा गोंधळ झाला. या अपघातात ज्या आंचल तिवारीचा मृत्यू झाला, ती आंचल तिवारी ‘पंचायत २’ची अभिनेत्री नव्हती. अपघातात मृत्युमुखी पडलेली आंचल तिवारी ही एक भोजपुरी अभिनेत्री होती. पण, सगळ्यांनाच ती 'पंचायत' अभिनेत्री आंचल तिवारी वाटली. पण आता ही बातमी खोटी ठरली आहे. नुकताच अभिनेत्रीने स्वतः व्हिडीओ शेअर करत आपण जिवंत असल्याचे म्हटले आहे.