Randeep Hooda: स्वातंत्र्यवीर सावरकर अर्थात विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील बायोपिक 'स्वातंत्र्य वीर सावरकर'मध्ये अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसला होता. यामध्ये अभिनेत्याने सावरकरांची प्रमुख भूमिका केली होती. आता वीर सावरकरांच्या १४१व्या जयंतीनिमित्त, रणदीप हुड्डा याने अंदमान आणि निकोबार बेटांवरील सेल्युलर जेलला भेट दिली. याच ठिकाणी सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. रणदीपने पत्नी लिन लैश्रामसोबत सेल्युलर जेलला भेट दिली.