Pavan Kalyan News: अभिनयाच्या विश्वातून राजकारणात आलेले पवन कल्याण सध्या खूप चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवन कल्याण यांचे खूप कौतुक करत होते. नुकतेच अभिनेते पवन कल्याण एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. यावेळी शपथविधी सोहळ्याला सुपरस्टार चिरंजीवी, रजनीकांत, नंदामुरी बालक्रिष्णन अशा दिग्गज कलाकारांनी आणि नेत्यांनी हजेरी लावली होती.