Actor Ayushmann Khurrana: आयुष्मान खुराना त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. आयुष्मान खुराना हा दोन मुलांचा बाबा देखील आहे. आयुष्मान आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी नेहमीच काहीना काही करत असतो. आता आयुष्मान त्याची लेक वरुष्कासोबत 'फायटर' चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसला आहे. बाप-लेकीचा हा क्युट व्हिडीओ त्याच्या पत्नीने शूट केला आहे.