मराठी इंडस्ट्रीमध्ये आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा वापर करुन एक बालनाटक सादर करण्यात येणार आहे. प्रसिध्द अभिनेत्री निर्मिती सावंत 'आज्जीबाई जोरात' या नाटकामध्ये धमाल उडवायला सज्ज झाली आहे. या नाटकातून अभिनय बेर्डे प्रथमच रंगभूमीवर पदार्पण करत आहे. निर्मिती सावंत आणि अभिनय बेर्डेसोबत पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर यांसारख्या अनुभवी कलाकारांची तगडी फौज देखील या नाटकातून आपल्या भेटीस येणार आहे. अभिनय या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करत आहे. या चित्रपटाविषयी त्याने काय भावना व्यक्त केल्या जाणून घेऊया..