Aaradhya Bachchan: झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडचे काही चर्चित स्टार किड्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. एकीकडे या स्टारकिड्सची चर्चा सुरू असतानाच आता आणखी एका स्टारकिडने सोशल मीडियावर कल्ला केला आहे. ही स्टारकिड आहे आराध्या बच्चन. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लेकीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा पाहायला मिळत आहे. आराध्या बच्चन हिच्या एका नाटुकलीची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच तिचं कौतुक करत आहेत.